आमदार बच्चू कडू नाशिक मनपा आयुक्तांवर धावून गेले !

आमदार बच्चू कडू नाशिक मनपा आयुक्तांवर धावून गेले !

नाशिक – नाशिक महापालिकेने अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नाही यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची आज भेट घेतली होती. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांनी थेट कृष्ण यांच्यावर अंगावर धावून गेले आणि आयुक्तांना शिवीगाळ  ही केली शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कडू यांना रोखले अन्यथा अनर्थ झाला असता.

नाशिक महापालिकेने 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नाही त्यामुळे मनपा मुख्यालयासमोर आज दुपारी बारा वाजता प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते.  यावेळी हा प्रकार घडला. महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

COMMENTS