बडतर्फीच्या निर्णयाविरोधात तेज बहादूर यादव जाणार कोर्टात

बडतर्फीच्या निर्णयाविरोधात तेज बहादूर यादव जाणार कोर्टात

‘बीएसएफ’चा जवान तेज बहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर आता या निर्णयाविरुद्ध आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

अतिशय निष्कृष्ठ दर्जाचे जेवण बीएसएफ जवानांना दिले जात असल्याची परिस्थिती त्यांनी व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर समोर आणली होती. ‘कॉन्स्टेबल रॅंकच्या जवानाने बीएसएफवर खोटे आरोप’ केल्याचा अहवाल या प्रकरणातल्या चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. बीएसएफच्या नियमांचे उल्लंघन करत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिन्यांचा कालावधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, यावर तेज बहादूर यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, याविरुद्ध मी उच्च न्यायालयात जाणार आहे. मला न्याय मिळेल, अशी आशा आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणता तेव्हा हे घडते आणि गेली अनेक वर्ष असेच घडत आहे’, असे म्हणत यादव यांनी आपल्यावरच्या कारवाईवर निराशा व्यक्त केली आहे.

COMMENTS