बाबरी मशीद प्रकरणी रामविलास वेदांतीसह पाचजण न्यायालयात शरण

बाबरी मशीद प्रकरणी रामविलास वेदांतीसह पाचजण न्यायालयात शरण

बाबरी मशीद प्रकरणी रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती, चंपत राय, बी.एल.शर्मा, महंत नृत्यगोपाल दास आणि धर्मदास हे लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयात शरण आले. भाजपचे माजी खासदार वेदांती यांनी एप्रिल महिन्यात बाबरी मशीद पाडण्यात लालकृष्ण अडवाणी यांचा हात नसल्याचे म्हटले होते. सीबीआयने बाबरी मशीद पाडल्याचा आरोप केलेल्या 13 लोकांपैकी वेदांती हे एक आहेत. 6 डिसेंबर 1992 रोजी ही कारसेवकांनी ही मशीद पाडली होती.

बाबरी मशीद पाडण्यामध्ये आपण महत्वाची भूमिका निभावली आहे. माझ्या सांगण्यावरून बाबरी मशीद पाडण्यात आल्याचा दावा रामजन्मभूमी वेदांती यांनी केला होता. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी मी फासावरही जाण्यास तयार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

ज्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली, त्या दिवशी कारसेवकांनी वशिष्ठ भवनात येऊन आता काय करायचे, अशी माझ्याकडे विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना म्हटले की, जोपर्यंत ही मशीद पाडणार नाही, तोपर्यंत मंदिराची निर्मिती होणार नाही. रात्री ११ वाजता तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मला दूरध्वनी करून उद्या काय होणार आहे, असे विचारले. त्यावेळी मी त्यांना कारसेवकांना दिलेल्या सूचनेची माहिती दिली. त्यावेळी नरसिंह राव यांनी मशीद पाडू द्यात. जे काय होईल ते पुढे पाहता येईल, असे रामविलास वेदांती यांनी म्हटले होते.

COMMENTS