बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने जागरण गोंधळ !

बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने जागरण गोंधळ !

बारामती – शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याकरिता शेतकरी गेली सहा दिवस विविध मार्गाने आंदोलन करीत आहे. तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावानेच गोंधळ घालीत राज्य शासनाला साकडे घातले. बारामतीमध्ये आज  चक्क  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने प्रशासकीय भवना समोर  जागरण गोंधळ घालण्यात आले. तहसील कार्यालयासमोर आंदोलन कार्यकत्यांनी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोटो ठेऊन त्यांचा नावाने जागरण गोंधळ घालण्यात आले.

उदो…उदो… मुख्यमंत्र्यांच्या नावाने उदो…उदो… देवेंद्रा गोंधळाला या… जागराला या…. अशी आर्जव करीत गोंधळीने शेतकऱ्यांच्या समस्या मांडायला सुरूवात केली. राज्य शासनाच्या, मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणांनी गोंधळ रंगत गेला.
मुख्यमंत्र्यांच्या नावाने तहसील कार्यालयापुढे जागरण गोंधळ जागरण गोंधळ घालण्यात आले.  गोंधळ मांडायचा म्हणून 12ची वेळ ठरली. नव्या प्रशासकीय इमारतीतील तहसील कार्यालयापुढे दुपारी 12 वाजता ताटं उभी राहिली, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो ठेऊन दगड ठेवण्यात आला. गोंधळ सुरू झाला, संबळ कडाडू लागला तशी माणसं जमा होऊ लागली. चारशे-पाचशे शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयापुढे गोंधळ मांडत मुख्यमंत्र्याच्या विरोधात घोषणा देत गोंधळ घातला, काहींनी गोंधळीच्या तालात ताल धरून उदो… उदोच्या आरोळ्या दिल्या. हा गोंधळ संध्याकाळी चार पर्यंत सुरू होता. बारामतीत गोंधळ सुरू असल्याची वार्ता शहरासह तालुक्‍यात सर्वत्र पसरली. यामुळे शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही (भाजप वगळून) येथे येऊन गेले. त्यांनीही गोंधळला हळद-कुंकू वाहत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.

 

 

COMMENTS