बारामती – बारामती नगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तीन अज्ञातांनी काल मध्यरात्री विजय गव्हाळेंवर हल्ला केला.
जखमी अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर बारामतीतील बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अॅड. विजय गव्हाळे हे दलित चळवळीचे नेते आहेत. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर आणि पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
COMMENTS