शिवसेनेची महत्वाची बैठक मातोश्रीवर सुरू

शिवसेनेची महत्वाची बैठक मातोश्रीवर सुरू

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे निवासस्थान मातोश्रीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे.  या बैठकीला खासदार संजय राऊत, रामदास कदम, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर आदी वरिष्ठ नेते या बैठकीस उपस्थित आहेत. संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना निमंत्रीत करण्यात आलं आहे. या बैठकीतील काय अजेंडा आहे याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. मात्र केंद्रातील मंत्रीमंडळ विस्तारावेळी भाजपने शिवसेनेसह मित्र पक्षांना दिलेली वागणूक आणि भाजपमधील हालचाली यावरुन खल होण्याची शक्यता आहे. पक्षाची पुढील रणनिती  काय असावी यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS