बालकांचे मनोरंजन करणारी बालचित्रवाणी बंद

बालकांचे मनोरंजन करणारी बालचित्रवाणी बंद

तोट्यात जाणारी बालचित्रवाणी अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या सर्वच कर्मचा-यांना आजच कार्यमुक्त करण्यात आले आहे. 50 पेक्षा कमी कर्मचारी तसेच कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न या कारणास्तव बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

बालचित्रवाणीला विविध प्रकल्प देऊन संजीवनी देण्याचे शिक्षण विभागाकडून काम देण्यात आले होते. या प्रकल्पांचे मानधन हे बालचित्रवाणीच्या दरपत्रकाप्रमाणे देण्यात आलेच नाही. राज्यातील ई लर्निंग साहित्य तयार करणाऱ्या संस्थांच्या साहित्याची तपासणी करण्याचे काम बालचित्रवाणीला देण्यात आले. या कामासाठी बालचित्रवाणीच्या दरपत्रकानुसार 25 हजार रुपये प्रत्येक प्रतीमागे आकरण्यात येतात. बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांचे पगार एप्रिल 2014 पासून म्हणजे गेले वीस महिने थकविण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांचे थकलेले सर्व वेतन देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. थकीत वेतन दिले तरी संस्थेचे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला होता अखेर आज संस्थाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS