बाळाला दूध पाजतानाचा “तो” फोटो “तिने” अखेर काढला !

बाळाला दूध पाजतानाचा “तो” फोटो “तिने” अखेर काढला !

किर्गिझस्तानचे राष्ट्रपती अलमाजबेक आतमबायेव यांची कन्या आलिया शागिएवा सोशल मीडियावर टीकेची धनी झालीय. कारण तिने तिच्या बाळाला दूध पाजतानाचे छायाचित्र पोस्ट केले आहे. या फोटोत स्तनपानाऐवजी आलियाचं अर्धनग्न शरीर अधिक दिसत असल्याने लोकांनी या छायाचित्रावर टीकेची झोड उठवली. त्यामुळे आलियाने हा फोटो काढून टाकला. पण तिने नंतर टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. ‘माझ्या स्तनांचं नैसर्गिक काम बाळाची भूक मिटवण्याचं आहे. त्याला कामुकतेशी जोडण्याचं काहीच कारण नाही,’ असं तिनं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

20 वर्षीय आलिया एक कलाकार आहे. तिने मुलाखतीत सांगितलं की ‘हा वाद या छायाचित्रामुळे नाही तर महिलांच्या शरीराला मर्यादेहून जास्त कामुकतेशी जोडण्यामुळे झालाय. मला हे शरीर मिळालंय ते अश्लील नाही. माझ्या स्तनांचं नैसर्गिक काम बाळाची भूक मिटवण्याचं आहे. त्याला कामुकतेशी जोडण्याचं काहीच कारण नाही. मी बाळाला दूध पाजते तेव्हा माझ्या बाळाकडे लक्ष देणं, त्याची काळजी घेणं मला सर्वात महत्त्वाचं वाटतं. लोक काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही.’

किर्गिझस्तान हा मुस्लिम बहुल देश कट्टरपंथी आहे. त्यामुळे तेथे या छायाचित्रावर टीका होणे स्वाभाविक आहे. खुद्द तीच्या वडील राष्ट्रपती अलमाजबेक आणि त्यांच्या पत्नीने आलियावर टीका केली आहे. आलिया आपल्या उदारमतवादी विचार आणि वागणुकीमुळे तिथे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. तिचे पती मूळ रशियाचे निवासी आहेत. आलियाला लग्नाचा सहा महिन्यातच मूल झालं आहे. किर्गिझस्तानचे लोक प्रामुख्याने मांसाहारी असतात, तर आलिया आणि तिचे पती शाकाहारी आहेत.

 

 

 

COMMENTS