बिहार सरकारचं काय होणार ?  आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षीत

बिहार सरकारचं काय होणार ? आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षीत

बिहार सरकारचं काय होणार असा प्रश्न सध्या पडला आहे. कारण ही तसंच आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे बिहार सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यातच विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा विरोधक उचलून धरणार असल्याने सरकार समोर अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तेजस्वी यादव यांच्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार स्वत:हून कारवाई करणार असून तेजस्वी यांना कोणत्याही क्षणी बडतर्फ केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राजद नेते हे भ्रष्टाचार प्रकरणी अडकल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी राजदने आज एका बैठकीचे आयोजन केले आहे. तर तेजस्वी यादव यांना बडतर्फ केल्यानंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संयुक्त जनता दलानेही वेगळ्या बैठकीचे आयोजन केले आहे. सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन केल्याने आज सायंकाळपर्यंतच बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांचं म्हणंण आहे.

दरम्यान, सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसावा म्हणून नितीश कुमार विशेष काळजी घेत आहेत. त्यातच तेजस्वी यादव यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्तेचं प्रकरणं उभं राहिलं असून तेजस्वी यांनी उत्पन्नाचा सोर्सही उघड केलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार अडचणीत आले आहेत. विधानसभेत या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत देण्यापूर्वीच तेजस्वी यांच्याविरोधात नितीश कुमार कारवाई करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS