बीएमसीवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे !

बीएमसीवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे !

मुंबई – मुंबईत 29 ऑगस्टला 9 तासात 298 मिमी म्हणजेच 30 सेंटीमीटर किंवा 12 इंच म्हणता येईल इतका पाऊस झाला होता. या पावसाने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. आता मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना निसर्गाला आपण नियंत्रित करु शकत नाही पण गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पावसाचा सामना करत असताना प्रशासनाने आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा केली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

29 ऑगस्ट रोजी मुंबईत 12 इंच पाऊस झाला होता. अनेक भागात पाणी साचले होते. या पावसाने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. शहराच्या अनेक भागात त्यामुळे पाणी साचले होते. या प्रभाव रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही पडला होता. रेल्वेसेवा तर जवळजवळ ठप्पच झाली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने सरकारने कार्यालयाने सुट्टी दिली होती. शाळा आणि कॉलेजही दुसऱ्या दिवशी बंद होते. यापूर्वी जुलै 2005 मध्ये असाच मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळीही हजारो लोक रात्रभर रस्त्यावरच होते. जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला होता. 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईत जवळपास तशीच स्थिती निर्माण झाली होती.

COMMENTS