थाकथित गोरक्षक हे नरभक्षक असून सगळ्यांना बीफ खाण्याचा हक्क असल्याचे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे बीफ नेत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या घटनेबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
आठवले म्हणाले, प्रत्येकाला बीफ खाण्याचा हक्क आहे. शेळीचे मांस महाग असल्यानेच लोक बीफ खातात. नागपूरात घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. गोरक्षणाच्या नावाखाली कोणालाच नरभक्षक बनण्याचा हक्क नाही. गोरक्षक हे मोदी सरकारची प्रतिमा बिडवत आहेत. त्यामुळे त्यांना कडक शिक्षा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
देशात नागपूरसारख्या घटना घडु नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने नागपूर घटनेत सामील असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS