रामनाथ कोविंद यांनी उद्धव ठाकरेंना केला फोन

रामनाथ कोविंद यांनी उद्धव ठाकरेंना केला फोन

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे  उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल कोविंद यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

रामनाथ कोविंद यांचे आज एका दिवसाच्या मुंबई दौ-यावर आले आहेत. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामनाथ गोविंद यांचं स्वागत केलं. त्यानंतर मरिन ड्राईव्ह येथील  गरवारे क्लबवर जोरदार स्वागत करण्यात आले. या क्लबवर बैठक घेण्यात आली होती, या बैठकीला  शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली आहे.

जेव्हा बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव भाजपाकडून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं तेव्हा दलित मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांचं नावं पुढे केलं जातं आहे, असा आरोप शिवसेनेने केला होता. पण त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दर्शविला.

 

COMMENTS