मध्यप्रदेशात आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार, 5 शेतकऱ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

मध्यप्रदेशात आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार, 5 शेतकऱ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन करत असताना या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शेतकरी आंदोलन दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढवलेले वीज दर कमी करावेत, या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावेत, या मागणयासाठी पुकारलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळाले. या वेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दहा ट्रक आणि दोन दुचाकी जाळल्या. पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक दगडफेक सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही शेतकऱ्यांना गोळ्या लागल्या. या प्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिला न्यायालयीन चौकशीचा आदेश दिले आहे.

मंदसौर, रतलाम आणि उज्जैन या ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

 

 

 

COMMENTS