नाशिकमध्ये आमदार बच्चू कडू यांना अटक

नाशिकमध्ये आमदार बच्चू कडू यांना अटक

नाशिक – आमदार बच्चू कडू यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेने 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर  आज दुपारी बारा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू त्यांनी आयुक्त कृष्ण यांच्यावर हात उगारला. याप्रकरणी उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सरकारी कामात अडथळा आणि शिविगाऴ केल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांना अटक केली आहे.

 

 

COMMENTS