लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकवल्याप्रकरणी कॉंग्रेसचे 6 खासदार निलंबित

लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकवल्याप्रकरणी कॉंग्रेसचे 6 खासदार निलंबित

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकवल्याप्रकरणी काँग्रेसच्या 6 खासदारांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

खासदार जी. गोगाई, के.सुरेश, अधिरंजन चौधरी, रणजित रंजन, सुश्मिता देव आणि एम.के.राघवन अशी याचा यात समावेश असून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही कारवाई केली. शून्य प्रहरात लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकावले. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

काँग्रेसने गोहत्येच्या नावाखाली जमावाकडून होत असलेल्या हत्यांच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी संपूर्ण देश गायीला माता मानतो. पण गोरक्षणाच्या नावाखाली कोणाची गुंडगिरी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पण यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यातच काँग्रेसने बोफोर्स तोफांवर घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या गोंधळात काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन  यांच्या आसनाच्या दिशेने कागद फेकले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी याचा विरोध केला. नंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कॉंग्रेसचे 6 सदस्य यांचे 5 दिवसांसाठी निलंबित केले.

बोफोर्स घोटाळ्यासंबंधी 31 वर्षांनी रिपब्लिक टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीमध्ये स्वीडनच्या माजी चीफ इन्व्हेस्टिगेटर यांनी तीन दावे केले आहेत.
# राजीव गांधी बोफोर्स डीलमध्ये बेकायदेशीर रीतीने होणाऱ्या पेमेंट्सबाबत जाणत होते.
#  राजीव गांधींनी स्वीडिश पीएमशी एका फ्लाइटमध्ये पेमेंट्सबाबत चर्चा केली होती.
# बोफोर्स कराराच्या बदल्यात स्वीडिश पंतप्रधानांनी फंड्स घ्यावेत अशीही राजीव यांची इच्छा होती.
 

 

 

 

COMMENTS