बेटींगप्रकरणी नगरसेवकाला अटक

बेटींगप्रकरणी नगरसेवकाला अटक

तमिळनाडू किक्रेट लीगच्या सामन्यावर बेटींग सुरू असलेल्या ठिकणी छापा टाकून निगडी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक जावेद शेख याचाही समावेश आहे.

नवीन मित्तल, राकेश मेहता, प्रवीण पवार, जकीर शेख आणि नगरसेवक जावेद शेख याला अटक केली आहे.या ठिकाणी 2 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांना नायर कॉलनी, साने चौक येथे बेटींग सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यावरून निगडी पोलिसांनी रात्री बाराच्या सुमारास ही कारवाई केली.

COMMENTS