बेस्ट कर्मचा-यांचा संप सुरू, ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल !

बेस्ट कर्मचा-यांचा संप सुरू, ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल !

मुंबई – बेस्टचे कर्माचारी हे महापालिकेचेच कर्मचारी आहेत. त्यामुळे महापालिच्या कर्माच-याप्रमामे वेतन आणि इतर सुविधा मिळाव्यात, पगार वेळेवर व्हावा या मागण्यासाठी बेस्ट कर्मचा-यांनी संप पुकराला आहे. रविवारी दिवसभर झालेल्या बैठकी सत्रांमध्ये काहीही तोडगा निघू शकला नाही. रात्री उशीरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली बेस्ट कामगार नेत्यांची बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे रात्री 12 वाजल्यापासून संपाला सुरूवात झाली आहे.

आठवड्याचा पहिला आणि राखी पोर्णिमेच्या दिवशी मुंबईकरांचे हाल सुरू झाले आहेत. दरम्यान आज पुन्हा दुपारी उद्धव ठाकरे आणि कामगार नेत्यांची बैठक होणार आहे. दरम्यान संप काळात खाजगी बसेस, स्कूल बस, खाजगी वाहने यांना प्रवास वाहतूक करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

COMMENTS