बैलगाडा शर्यती सुरु होण्याचा मार्ग मोकळा; विधानसभेत विधेयकाला मंजूरी

बैलगाडा शर्यती सुरु होण्याचा मार्ग मोकळा; विधानसभेत विधेयकाला मंजूरी

तामीळनाडू येथील जलीकट्टू स्पर्धेच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत सादर केलेल्या विधेयकाला विधीमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जाणकर यांनी विधानसभेत यासंदर्भातील विधेयक मांडले. या विधेयकाला आज मंजुरी मिळाली आहे.

 

प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत असलेल्या विधेयकात सुधारणा करणारे विधेयक जाणकर यांनी मांडले असून  शर्यती दरम्यान बैलांचा छळ करणाऱ्यांना पाच लाख दंड किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
नव्या सुधारित विधेयकात बैलगाडी शर्यत, छकडा, शंकरपट अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धा भरवण्याची परवानगी देण्यात येणार आहे . ज्या ठिकाणी स्पर्धा भरवण्यात येईल त्या ठिकाणी संबंधित आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत या स्पर्धेला परवानगी देण्यात येणार आहे. दरम्यान, प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 2011 मध्ये बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्राण्यांच्या खेळावर बंदी आली होती.

COMMENTS