बॉलिवूडचा खिलाडी काय म्हणाला गुरुदासपूर पोटनिवडणुकीबाबत ?

बॉलिवूडचा खिलाडी काय म्हणाला गुरुदासपूर पोटनिवडणुकीबाबत ?

ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार विनोद खन्ना यांच्या निधनामुळे पंजाबमधील गुरूदासपूर लोकसभा निवडणुकीची पोटनिडणूक लागणार आहे. त्यासाठी भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे. दिवंगत विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून आहे. त्याचसोबत बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचंही नाव चर्चेत आलं आहे. मात्र आपण गुरुदासपूर पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण अक्षयकुमारनं दिलंय. अशा बातम्या कुठुन येतात हेच मला समजत नाही असंही तो संतापाने म्हणाला. गेल्या काही दिवसात त्याचा सामाजिक उक्रमामधील सहभाग आणि भाजप नेत्यांशी वाढलेले संबंध याच्या पार्श्वभूमीवर काही प्रसारमाध्यमांनी अक्षयकुमारला गुरूदासपूरमधून तिकीट मिळू शकते असे वृत्त दिले होते. त्याचे त्याने खंडन केले आहे. त्यामुळे आता कविता खन्ना यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. विनोद खन्ना गुरूदासपूरमधून सलग 4 वेळा निवडणू आले होते. त्यांच्या शूटिंगच्या व्यस्त शेड्यूल्डमुळे कविता याच मतदारसंघात लोकांशी भेटायच्या. त्यामुळे त्या मतदारसंघात परिचयाच्या आहेत. त्याचबरोबर इतर काही स्थानिक नेतेही ही निवडणुक लढवायचा इच्छुक आहेत.

COMMENTS