हेग – हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानामध्ये फाशीची शिक्षा झालेले भारताचे कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिली आहे. भारताने मागणी केलेली कॉन्सिलर अक्सिसची मागणी योग्य असल्याचंही आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायाधिश रॉनी अब्राहम यांनी आपल्या निकाल पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आता भारताचे प्रतिनिधी पाकिस्तानात जाऊन कुलभूषण यांची बाजू मांडू शकणार आहेत.
COMMENTS