ब्रेकिंग न्यूज – …. तर 5 जुनला महाराष्ट्र बंदची हाक ! शेतकरी आक्रमक

ब्रेकिंग न्यूज – …. तर 5 जुनला महाराष्ट्र बंदची हाक ! शेतकरी आक्रमक

राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नाकडे गाभीर्याने पाहत नसल्यामुळे आता येत्या पाच तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तर 6 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालयांना कुलुप लावण्यात येणार आहे. तर 7 जुनला मंत्री आणि आमदारांच्या घराला कुलुप लावण्यात येणार आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी आज किसान क्रांती  मोर्च्याच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावलं असून यामध्ये यामध्ये चर्चा न निघाल्यास 5 जुनचा महाराष्ट्र बंद अटळ आहे. दरम्यान अण्णा हजारेंनी सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये दर्शवलेली मध्यस्थीची भूमिका किसान क्रांती मोर्चाने फेटाळली आहे.

COMMENTS