राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता. 13) जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालाकडे राज्यातली विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. याबाबत सोशल मीडियातून अनेक वेगवेगवेगळे संदेश फिरत होते मात्र, आज दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली असून उद्या दुपारी एक वाजता दहावीच्या निकाला लागणार आहे.
राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती . गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभर उशिराने लागत आहे. मुंबई विभागाचे बोर्ड परीक्षेचे काम अपूर्ण असल्यामुळे या वर्षी निकालास विलंब लागला आहे.
निकाल कुठे व कसा पाहाल?
- हा निकाल तुम्ही mahresult.nic.in , results.nic.in , examresults.net या संकेतस्थळावर पाहू शकता.
- महाराष्ट्र बोर्डाच्या nic.in या संकेतस्थळावर भेट द्या.
- SSC Result 2017 यावर क्लिक करा.
- तुमचा परीक्षा क्रमांक आणि अन्य माहिती रकान्यांमध्ये भरा आणि ‘सबमिट’वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल.
COMMENTS