राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी भाजपतर्फे समितीची स्थापना

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी भाजपतर्फे समितीची स्थापना

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला काही आठवडे उरले असताना भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी  तीन सदस्यांची समितीची स्थापना केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीबद्दल विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने ही समिती स्थापना केली असून,  या समितीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा या समितीत समावेश आहे.

राष्ट्रपतीपदाबाबत सहमतीचा उमेदवार निवडण्यासाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे. हे तिन्ही नेते राष्ट्रपती निवडणूकीसाठी सर्वसहमती घेण्याचे काम करतील. विशेष म्हणजे विरोधी पक्षांशीही चर्चा ही समिती करणार आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलैला होणार असून निवडणुकीचा निकाल 20 जुलैला लागणार आहे.

COMMENTS