भाजपच्या पाठिंब्याने मनसेचे ललित कोल्हे जळगावचे महापौर !

भाजपच्या पाठिंब्याने मनसेचे ललित कोल्हे जळगावचे महापौर !

जळगाव – मनसेचे नेते आणि नगरसेवक ललित कोल्हे यांची जळगावच्या महापौरपदी निवड झाली आहे. खान्देश विकास आघाडी आणि भाजपच्या पाठिंब्यावर कोल्हे यांची महापौरपदी निवड झाली आहे. 75 सदस्य असलेल्या जळगाव महापालिकेत मनसेचे अवघे 12 सद्सय आहेत. तरीही मनसेचा महापौर झाला आहे. खान्देश विकास आघाडीकडे 33 सदस्य आहेत. तर भाजपकडे 15 सदस्य आहेत. खान्देश आघाडीने आणि भाजपने मनसेला पाठिंबा दिल्याने त्यांचा महापौर निवडूण आला. महापालिकेत राष्ट्रवादीचे 11 सदस्य आहेत. तर जनविकास आघाडीचे 2 तर अपक्ष 2 सदस्य आहेत.

खान्देश विकास आघाडीचे नितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. माजी मंत्री सुरेश जैन यांची खान्देश विकास आघाडी आहे.

 

COMMENTS