लातूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूरमध्ये अपघात झालाय. मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला कोणतीही इजा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वःत ट्विट करुन या अपघाताची माहिती दिली आहे. अपघातात हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढलं असून ते सुरक्षित आहेत. सध्या ते पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घरी गेले आहेत.
संवाद यात्रेसाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात होते. आज ते निलंगा येथून मुंबईला निघाले होते या दरम्यान हा अपघात झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधत, मी सुखरुप आहे. माझी डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे. मला काहीही झालेले नाही असे सांगितले आहे.या अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
COMMENTS