मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 116 मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर ट्विटरवरुन शिवसेनेवर आशिष शेलार यांनी जहरी टीका केली.
पोटनिवडणुकीत मोठे दावे करणार्यांचे पोट फाडून भाजपचा विजय, अशा शब्दात निशाणा साधला आहे. मुंबईकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले? असेही ट्वीट आशिष शेलार यांनी केल्यामुळे आता शिवसेना भाजपच्या या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपच्या जागृती पाटील यांना या निवडणुकीत तब्बल 11129 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना केवळ 6337 मते मिळाली आहेत
पोटनिवडणूकीत मोठे दावे करणार्यांचे पोटफाडून भाजपाचा विजय… कार्यकर्त्तांचे अभिनंदन!!
— ashish shelar (@ShelarAshish) October 12, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले?
— ashish shelar (@ShelarAshish) October 12, 2017
पोटनिवडणूकीतही भाजपलाच मुंबईकरांची साथ! भांडूपमधे भाजपा उमेदवार जागृती पाटील यांचा विजय… मुंबईकरांचे, भांडुपकरांचे आभार!!
— ashish shelar (@ShelarAshish) October 12, 2017
COMMENTS