भाईसाहेब सावंत यांचा नातू विक्रांत सावंत अखेर शिवसेनेत

भाईसाहेब सावंत यांचा नातू विक्रांत सावंत अखेर शिवसेनेत

काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री भाईसाहेब सावंत यांचे नातू विक्रांत सावंत यांनी आज (बुधवारी) पत्नी सोनल सावंत व सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले.

यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक, अभय शिरसाठ, सागर नाणोस्कर  उपस्थित होते.

मातोश्री निवासस्थानी विक्रांत सावंत यांच्यासोबत भाजपाचे सावंतवाडी युवा उपाध्यक्ष गुणाजी गावडे, कॉंग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आनंद तळणकर, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष दिनेश सावंत, माजगावच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हेलन निब्रे, मनसे दोडामार्ग विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष दिपक देसाई, दोडामार्ग तालुका भाजपा सांस्कृतिक मोर्चा अध्यक्ष मदन राणे, अभिषेक सावंत, भाई निब्रे,दिपक कोटगी, प्रतिक सावंत,दिपक  गावडे, तेजस गावडे, सतीश सातार्डेकर, साईप्रसाद राणे, तुकाराम तेंडोलकर, संदीप गावडे,  विद्याधर सावंत, तेजस परब, गौतम मधाळे, पप्पू गावडे, रितेश सावंत, किरण सावंत, सुहास चव्हाण, अॅड.यश देसाई, राजू सुभेदार, प्रसाद मयेकर, रामकृष्ण देसाई, प्रणिता सावंत, अक्षता मडव, नमिता सावंत, भाविका सावंत, वेद सावंत, सुश्मिता सावंत, किरण चव्हाण, तुषार पवार, अमोल सावंत, अजिक्य सावंत, प्रसाद सावंत, अनिल सावंत, प्रदीप सावंत, अशोक परब, रूपेश दळवी दर्शन चव्हाण आदींनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर आदींनी शिवबंधन बांधले.

COMMENTS