शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असणारेच आंदोलन करत आहेत – नितीन गडकरी

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असणारेच आंदोलन करत आहेत – नितीन गडकरी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी आम्ही जबाबदार नाही. फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने मते घेऊन सत्तेत असणारे यापूर्वीचे सरकारच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार आहे. तेव्हाच्या मंत्र्यांनी जनतेऐवजी आपल्या परिवाराचा विचार केला. त्यामुळेच आधीच्या सरकारला जनेतेने झाडूने साफ केले. आज तेच आंदोलन करत फिरत आहेत. राज्यात 50 टक्के सिंचन होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे स्पष्ट मत भाजप नेते व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच येत्या दोन वर्षात कृषी विकासाचा दर 20 टक्के झाला पाहिजे, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित भाजपच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी अधिवेशनाचे उद्घाटन भाजप नेते गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला जबाबदार धरले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

COMMENTS