भाजप कर्नाटकमध्ये होणा-या विधानसभेच्या तयारीला लागली आहे. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडुरप्पा हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.
कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू होता. मात्र हा वाद सोडवण्यात अमित शहा यांना यश आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसला खाली खेचण्यासाठी आता भाजपने पुन्हा येडुरप्पा यांच्यावर विश्वास टाकला आहे. कर्नाटकात येडुरप्पा यांचा चांगलाच प्रभाव आहे. येडुरप्पा यांनी 2011 साली पक्ष काढला होता. मात्र, 2013 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना अपयश आले होते. पण, त्यांच्या पक्षामुळे झालेल्या मतविभागणीमुळे भाजपला बऱ्याच जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते.
COMMENTS