शशी थरुर यांनी केला अर्णव गोस्वामींवर मानहानीचा दावा

शशी थरुर यांनी केला अर्णव गोस्वामींवर मानहानीचा दावा

काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे. रिपब्लिक नावाचे नवे न्यूज चॅनेल सुरू केल्यानंतर गोस्वामी यांनी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबतच्या प्रकरणावर गौप्यस्फोट केला होता.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर शशी थरुर यांनी मृतदेहाला तेथून हटवले होते, असा धक्कादायक दावा केला होता. याविरोधात थरुर यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे. याबद्दल थरूर यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली आहे.

अर्णब गोस्वामी यांनी नुकतच रिपब्लिक टीव्ही हे नवीन न्यूज चॅनल सुरू केलं आहे. लॉन्चिंगला या चॅनलवर त्यांनी अनेक धक्कादायक स्पेशल स्टोरी करण्यात आल्या होत्या. रिपब्लिक टीव्हीवरच्या एका विशेष कार्यक्रमात सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणाची माहिती देताना गोस्वामी यांनी सुनंदा यांच्या मृत्यूनंतर शशी थरुर त्या खोलीत आल्याचे पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्याचे विधान केले होते. याशिवाय, सुनंदा पुष्कर यांचा गुढ मृत्यू झाल्यानंतर रुम नंबर 309 मध्ये शशी थरूर सकाळी आणि संध्याकाळी आले होते याचे पुरावे असल्याचाही दावा या कार्यक्रमात करण्यात आला. त्यांच्या या दाव्याविरोधात शशी थरूर यांनी याप्रकरणी थेट कोर्टात धाव घेऊन असून गोस्वामी यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शशी थरुर यांच्या पत्नीचा गुढ मृत्यू झाला होता. सुनंदा पुष्कर यांच्या या गुढ मृत्यूचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.शशी थरुर यांच्यावरही सुनंदाच्या या मृत्यूबाबत संशयाची सुई आहे. अनेक वैद्यकीय चाचण्यांनंतरही पोलीस या प्रकरणाचा खुलासा करू शकलेले नाहीत. प्रकरणाची चौकशी अगदी अमेरिकेच्या एफबीआयपर्यंत पोहोचली. पण त्यांच्याकडूनही काही ठोस माहिती उघडकीस येऊ शकली नाही.

COMMENTS