भाजपचा खासदार अडकला हनी ट्रॅपमध्ये !

भाजपचा खासदार अडकला हनी ट्रॅपमध्ये !

 

दिल्ली – भाजपचे गुजरातमधील वलसाडचे खासदार के सी पटेल यांनी दिल्ली पोलिसांमध्ये एका महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने आपल्याला फसवले असून आपल्याकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही खासदार के सी पटेल यांनी केला आहे.

एके दिवशी एक महिला खासदार के सी पटेल यांच्याकडे एका कामानिमित्त आली होती. तिने तिचे काम करण्याची विनंती के सी पटेल यांना केली. त्यांनंतर त्या महिलेने खासदार पटेल यांना तिच्या गाझीयाबादच्या घरी बोलावले. त्यांना कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे पटेल बेशुद्ध झाले. याचा फायदा घेत महिलेने त्यांच्यासोबत आक्षपार्ह स्थितीमधले फोटो काढले आणि शूटिंगही केले. पटेल हे शुद्धीवर आल्यानंतर त्या महिने त्यांना ते शूटिंग दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रय़त्न केला. 5 कोटी रुपये देण्याची मागणी केली. नाही दिले तर सोशल मीडियावर शूटिंग व्हायरल करण्याचे आणि पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची धमकी खासदारांना दिली. दरम्यान या प्रकरणानंतर खासदार के सी पटेल यांनी दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच ती महिला फरार झाली आहे. ती महिला अशा प्रकारची गँग चालवत असल्याचंही पटेल यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करण्यासाठी एका खास  टिमची स्थापना केली आहे.

COMMENTS