भाजपचा राणेंबाबतचा निर्णय उद्या किंवा परवा ?

भाजपचा राणेंबाबतचा निर्णय उद्या किंवा परवा ?

मुंबई  – भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्या रात्री राणेंबाबबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राणेंना भाजपमध्ये प्रवश द्यायचा की नाही याबाबत निर्णय होईल. जर राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला तर ऑक्टोबरमध्ये राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये राणेंची वर्णी लागू शकते अशीही चर्चा आहे. राणेंचा भाजप प्रवेश झाला नाही तर ते नवीन पक्षाची स्थापना करु शकतात. त्याची घोषणा राणे दस-यापर्यंत करतील.

COMMENTS