भाजपच्या कर्जमाफीची पोस्टर्स शेतकरी संघटनेने फाडली

भाजपच्या कर्जमाफीची पोस्टर्स शेतकरी संघटनेने फाडली

कोल्हापूर – भाजपने कर्ज माफी झाली… शेतकरी सुखावला… आशा आशयाचे फलक लावले होते. हे फलक फसवे असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करुन फाडून टाकले. पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे फोटो होते तेही फाडण्यात आले.

राज्यातील शेतकऱयांनी विविध मागण्यासाठी संप पुकारलेला आहे. यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसताना भाजपच्या शेतकरी आघाडीच्या वतीनं संपूर्ण कोल्हापूर शहरात कर्ज माफी झाली. खरा शेतकरी सुखावला आशा आशयाचे फलक लावण्यात आले. या फलकावर मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन… धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा…अफवा पिकवणाऱ्या लुटारूंना ठोसा… अशा आशय लिहिण्यात आला. परंतु, लक्ष्मीकांत दिंडोरे, माणिक शिंदे , मुन्ना सय्यद यांनी कसबा बावडा परिसरात लावण्यात आलेले हे फलक फाडुन टाकले.

COMMENTS