एनडीएचे मुख्यमंत्री म्हणून आज 5 वाजता नीतीशकुमारांचा शपथविधी, 24 तासात दुसरा संसार !

एनडीएचे मुख्यमंत्री म्हणून आज 5 वाजता नीतीशकुमारांचा शपथविधी, 24 तासात दुसरा संसार !

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नीतीशकुमार 24 तासाच्या आता पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. यावेळी मात्र  ते एनडीए बरोबर संसार थाटणार असून, भाजपही नीतीशकुमार यांच्या मंत्रिमंडलात सामिल होणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता नीतीशकुमार यांचा मुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथविधी होणार आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाला पंपप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. काल महागठबंधनचे मुख्यमंत्री असेलले नीतीशकुमार यांनी राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांंनी राजीनामा द्यावा अशी नीतीशकुमार यांची इच्छा होती. मात्र यादव यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे भ्रष्टाचाराचा डाग आपल्याला लागू नये यासाठी त्यांनी 24 तासात कोलांटउडी मारली आहे. राजीनामा दिल्यानंतर कालच अवघ्या तीन तासात त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा दावा राज्यपालांकडे केला आहे. त्यानुसार राज्यपालांनी त्यांना आता सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. नीतीशकुमार यांनी राज्यपालांकडे पाठिंबा दर्शवणा-या 131 आमदारांची यादी सोपवली आहे. राज्यपालांनी नीतीशकुमार यांना दोन दिवसात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

COMMENTS