अमित शहा गुजरातमधून राज्यसभेच्या रिंगणात

अमित शहा गुजरातमधून राज्यसभेच्या रिंगणात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेसाठी गुजरामधून भाजपचे उमेदवार असणार आहेत. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शहा हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता या उमेदवारीमुळे ही शक्यता मावळली आहे. अमित शहा हे केवळ 2019 ची निवडणूक आणि राष्ट्रीय राजकारणातच राहतील असे संकेत मिळत आहेत.  अमित शहा यांच्यासोबत सृती इराणी याही गुजरातमधून भाजपच्या उमेदवार असतील. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय.

COMMENTS