कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा हे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. येडियुरप्पा हे सध्या भाजपचे कर्नाटकाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. येडीयुरप्पा हे नुकतेच टुमकूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यावेळी ते पक्षाच्या पदाधिका-यांसह एका दलिताच्या घरी जेवण करायला गेले. तिथे त्यांनी इडली खाल्ली, मात्र ती घरी बनवलेली नव्हती तर त्यासाठी त्यांनी हॉटेलमधून जेवण मागवले होते. खुद्द ज्या दलिताच्या घरी ते जेवायला गेले त्या कुटुंबातीलच एका व्यक्तीने हा आरोप केला असून त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये अस्पृष्यतेची तक्रार करण्यात आली आहे. एएनआयनं हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे प्रकरण येडीयुरप्पा यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय हेतून हे आरोप केल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
COMMENTS