1 जूनपासून शेतकरी संपावर, शहराकडे येणारे दूध, भाजीपाला रोखणार !

1 जूनपासून शेतकरी संपावर, शहराकडे येणारे दूध, भाजीपाला रोखणार !

संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकरी येत्या 1 जूनपासून बेमुदत संपावर जाणार असून, या काळात जिल्ह्यातील कोणत्याही गावातून शहरांच्या दिशेने दूध वा भाजीपाल्याची वाहने जाऊ दिली जाणार नाहीत असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शेतक-याच्या संप मोडीत काढण्यासाठी सरकारने काही ठराविक लोकांशी बोलणी करुन संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विरोधी नेते मतांसाठी तर सरकार स्थिर राहण्यासाठी आटापिटा करीत आहे. त्यात शेतकर्‍याचे मरण होत आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही अश्‍वासनांना किंवा विरोधकांच्या दुटप्पी धोरणाला न जुमानता शेतकरी संघटना 1 जून रोजी रस्त्यावर उतरुन बेमुदत संप यशस्वी घडवून आणणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी दूध व भाजीपाल्याची गावाबाहेर विक्री करू देणार नाही. या आंदोलनास सर्वांनी पाठिंबा द्यावा असे अवाहन  अनिल घनवट यांनी  केलयं.

शेतकर्‍यांनी संप स्थगित केल्याच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 1 जुन पासून दूध, भाजीपाला व शेतीमाल विक्रीस गावाबाहेर जाऊ देणार नाही असे घनवट म्हणाले.  संपामध्ये शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे.

COMMENTS