मुंबई – मुंबईतील एसआरए प्रकरणातील आरोपावरुन घेरलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी आणि एका सहकारी मंत्र्यावर गंभीर आरोप केलेत. आपली प्रतिमा मलिन करण्यासा पक्षातील काही पदाधिकारी आणि एक मंत्री कार्यरत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश मेहता यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या मंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा ठेऊन पक्षातलेच काही जण आपल्याविरोधात कार्यरत असल्याचंही मेहता यांचं म्हणणं आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रकाश मेहता यांनी हे आरोप केले आहेत.
विरोधी पक्षाने यावरुन मंत्री प्रकाश मेहता आणि मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी केली होती. त्यावरुन त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. या प्रकरणी विरोधकांना आपल्याच पक्षातील काही जण माहिती पुरवत असल्याचा आरोप करत. आपल्या मंत्रीपदावर डोळा असल्यामुळेच आपल्याला बदनमा करण्यात येत असल्याचं मेहता यांचं म्हणणं आहे. आता पक्षातील ‘ते’ पदाधिकारी कोण ? ‘तो’ मंत्री कोण ? मुख्यमंत्री त्या पदाधिका-यांवर आणि त्या मंत्र्यांवर कारवाई करतात की प्रकाश मेहतांना घरचा रस्ता दाखवतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रसिद्धी पत्रकावरुन पक्षातूनच दबाव येऊ लागताच. प्रकाश मेहता यंनी घूमजाव केलंय. आपण असं प्रसिद्धी पत्रक आपण काढलच नाही असा दावा त्यांनी केलाय.
COMMENTS