भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल !

भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल !

भंडारा – पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या आमदार चरण वाघमारेंना पोलीस शिपाई असलेल्या पतीने फोनवर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. राहुल इंगळे असे या पोलीस शिपायाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी शिपाई राहुल इंगळे यांनी आमदारांना तब्बल 20 वेळा फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर आमदारांनी या पोलीस शिपायाच्या विरोधात पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या पोलीस शिपायाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS