भाजप कार्यकर्त्यांची आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात जोरदार निदर्शने

भाजप कार्यकर्त्यांची आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात जोरदार निदर्शने

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बॉम्ब फोडू असे वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आज पुण्यात जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी बच्चू कडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांना अटक करण्याची मागणी केली.

 

नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलत असताना शेतकऱ्यांचा आक्रोश बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भगतसिंगने जसा विधिमंडळात बॉम्ब टाकला होता, तसा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर बॉम्ब फोडू, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले होते. यापूर्वीही अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचा निषेध करत त्यांना दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. या वक्तव्याप्रकारणी स्पष्टीकरण देताना बच्चू कडू यांनी बॉम्ब फेकणार म्हणजे खरोखरचा बॉम्ब फेकणार असं म्हणालो नाही. कोणालाही त्रास होणार नाही असा सुतळी बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते.

 

COMMENTS