पिंपरी चिंचवड – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, तूर खऱेदी करण्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पिंपरी पोलिसंनी ताब्यात घेतले आहे. भाजप कार्यकारणी बैठकीच्यावेळी प्रवेश द्वारावर तुरडाळ, कांदे, दारुच्या बाटल्या फोडून सरकार विरोधी घोषणाबाजी केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात भाजपच्या कार्यकारिणी समितीचे दोन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. या ठिकाणी तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तूर डाळ, कांदा आणि दारुच्या बाटल्या सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फेकून आंदोलन केले.
COMMENTS