नवी दिल्ली – छत्तीसगढमधील कोरबा लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रतिनिधित्व करणारे खासदार बन्सीलाल महतो यांनी मुलींविषयी मुक्ताफळे उधळली आहेत. छत्तीसगढच्या मुली ‘टनाटन’ असल्याचे या खासदारांचे म्हणणे आहे. बन्सीलाल महतोंच्या या विधानावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गांधी जयंती निमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेदरम्यान एका कार्यक्रमात ते बोलत होते.
बन्सीलाल महतो म्हणाले की, राज्याचे क्रीडामंत्री भैयालाल रजवाडे मला नेहमीच मला सांगतात, ‘आता मुंबई, कोलकत्याच्या मुलींची गरज नाही. कोरबा आणि उर्वरीत छत्तीसगढच्या मुली टना-टन होत चालल्या आहेत.’
दरम्यान , ‘बंन्सीलाल यांनी केलेले विधान त्यांचे व्यक्तिगत मत आहे. माझ्या संभाषणाचा संदर्भ त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापरला असावा’, असे मत भैयालाल रजवाडे व्यक्त केले.
COMMENTS