भाजपमध्ये बेताल, बेजबाबदार आणि संतापजनक वक्तव्य करणा-यांची काही कमी नाही हे वारंवार दिसून आलंय. आता भाजपच्या एका खासदारानं सैन्यातील जवानांबाबत अत्यंत संतापजनक वक्तव्य केलंय. जवान लष्कारात आहेत, म्हणज्ये ते मरणारच, मला जगात असा एखादा देश दाखवा जिथे जवान मरत नाहीत अशा प्रकारचं संतापजनक आणि बेजबाबदार वक्तव्य भाजपचे खासदार नेपाल सिंग यांनी केलं आहे.
खासदार महाशय एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते म्हणतात, गावातही भांडणं होतात. त्यात कोणी ना कोणी जखमी होतं. असा कुठला देश दाखवा की ज्या देशात भांडण होतं नाहीत आणि माणसं मरत नाहीत. आता देशभक्तीच्या 56 इंच छातीची भाषा करणारे पंतप्रधान या नालायक खासदारावर काय कारवाई करतात ते पहावं लागेल.
"Ye to roz marenge Army mein, koi aisa desh hai jahan army ka aadmi na marta ho jhagde mein? Gaon mein bhi jhagda hota hai to ek na ek to ghaayal hoga hi! Koi aisi device batao, jisse aadmi na mare? Aisi cheez batao ki goli kaam na kare, use karwa dein" says BJP MP Nepal Singh pic.twitter.com/Tnb0gT0VKr
— ANI (@ANI) January 2, 2018
COMMENTS