कर्नाटकातील अनेक भाजप आमदार काँग्रेसच्या संपर्कात ?

कर्नाटकातील अनेक भाजप आमदार काँग्रेसच्या संपर्कात ?

बंगळुरू – कर्नाटकातील अनेक भाजप आमदार आणि मोठे नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी परमेश्वर यांनी केला आहे. संबधित आमदारांनी आपल्याकडे पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे असंही त्यांनी सांगितलं. मात्र प्रत्येकाला पक्षात सामावून घेणं शक्य नाही. त्यामुळे स्थानिकांना विचारात घेऊनच याबाबत निर्णय घेऊ असंही परमेश्वर यांनी स्पष्ट केलं आहे.

संयुक्त जनता दलाचे 7 बंडखोर आमदारही लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश कणार असल्याची माहितीही परेमश्वर यांनी दिली आहे. कर्नाटकात 2016 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्या आमदारांनी काँग्रेसला मतदान केलं होतं. त्यानंतर जेडीएसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. यापूर्वीच या सात आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.

COMMENTS