भाजप नगरसेवकाला हत्येचा कट रचल्याप्रकरणी 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी

भाजप नगरसेवकाला हत्येचा कट रचल्याप्रकरणी 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी

नाशिक – भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी शेट्टी यांना अटक केली. 20 महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. खुनाच्या गुन्ह्यातील संशयित जालिंदर उर्फ ज्वाला उगलमुगले याचे अपहरण व खुनातील संशयावरून पंचवटीतील भाजपा नगरसेवक हेमंत आण्णा शेट्टी, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व राकेश कोष्टी यांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  एम. के. पिंगळे यांनी 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
1 ऑक्टोबर 2015 रोजी जालिंधर उर्फ ज्वाल्या उगलमुगले बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले होते. नगरसेवक हेमंत शेट्टीच्या सांगण्यावरून जालिंधरचे अपहरण व हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिले. वर्चस्व वादाच्या लढाईतून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पंचवटीतील  ज्वाल्या अंबादास उगलमुगले (वय 23, रा.संजयनगर, पंचवटी) हा 1 अॉक्टोबर 2015 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरातून गायब झाल्यानंतर त्याचा शोध लागत नव्हता. दरम्यान  पाथरवट लेन परिसरांत पुर्ववैमण्यसातून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना झाली. यात पोलिसांनी अविनाश कौलकर व रोहित कडाळे (रा. संजयनगर, पंचवटी) यांना अटक केली. यात चौकशी सुरु असताना ज्वाल्याचे अपहरण व हत्येच्या कटात देखील त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची कसून चौकशी केली असता या कटात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, शाम महाजन, कुंदन परदेशी हे देखील सहभागी असल्याचे उघड झाले.

COMMENTS