आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींची प्रकृती खालावली

आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींची प्रकृती खालावली

आत्मक्लेश यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती मोठ्या प्रमाणवर खालावली आहे.  यात्रेनिमित्त त्यांनी 100 किमीहून अधिक पायी प्रवास केल्यामुळे त्यांच्या पायाला फोड आले आहेत आणि दोन्ही पाय सुजले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शेट्टी यांचा रक्तदाब कमी झाला असून, त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.

पुणे येथून 22 मे रोजी ही यात्रा सुरू झाली. पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करून मुंबईकडे रवाना झालेली ही शेतकऱ्यांची आत्मक्लेश यात्रा सध्या नवी मुंबईतील पनवेलजवळ पोहोचली आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे.

राजू शेट्टी प्रणीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. केवळ स्वाभीमानीच नव्हे तर, इतर क्षेत्रातील मंडळींनीही या यात्रेत लक्षणीय सहभाग घेतला आहे.

COMMENTS