भाजप नेत्याच्या अश्लिल चाळ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, बलात्काराचा गुन्हाही दाखल !

भाजप नेत्याच्या अश्लिल चाळ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, बलात्काराचा गुन्हाही दाखल !

गडचिरोलीचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र बावनथडे यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका महिलेशी अश्लिल चाळे करतानाचा तो व्हिडिओ आहे. गडचिरोलीहून नागपूरला जात असताना बसमध्ये हा प्रकार झाला. बसच्या सीसीटीव्ही कॅमेरॅत तो कैद झाला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन रविंद्र बावनथडे यांच्याविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्याशी बळजबरीने बावनथडे यांनी हा प्रकार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान रविंद्र बावनथडे सध्या फरार आहे.

COMMENTS