जनतेच्या हितासाठी गरज पडल्यास भाजप पक्षात प्रवेश करेन. त्यासाठी चित्रपटात काम करणे सोडावे लागले तरी चालेल, अशी प्रतिक्रिया अभिनेते कमल हसन यांनी दिली आहे.
भाजपला माझी वैचारिक पार्श्वभूमी माहीत आहे. राज्याच्या हिताचा विचार केल्यास आणि त्यांना माझी विचारधारा मान्य असेल तर मी भाजपमध्ये जाऊ शकतो. जनतेच्या विकासासाठी मी राजकारणात कोणताही अस्पृश्यता मानत नाही. असे कमल हसन म्हणाले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कमल हसन यांची नुकतीच भेट घेतली होती. तसेच त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. या पार्श्वभूमीवर कमल हसन यांची ही प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
COMMENTS