सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही – रामदास कदम

सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही – रामदास कदम

औरंगाबाद – मराठवाड्यातल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले आहे.
आगामी निवडणुकीत भाजपसोबत जायचं नसेल तर स्वबळावर सत्ता कशी मिळवायची याबाबत उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातल्या आमदारांशी चर्चा केली. मंत्र्यांबाबतचे प्रश्नही उद्धव ठाकरेंनी समजून घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले.
दरम्यान नाराय़ण राणे आणि अमित शाहांच्या भेटीबद्दल कदमांनी जोरदार टोला हाणलाय. राणेंचं ह़ॉस्पिटलच्या उद्घाटनासंबंधी काम होतं असं म्हणत राणेंना हॉस्पिटलची गरज असल्याची कोपरखळी हाणली.
शिवसेनेत कोणतेही गट नाहीत. एकही आमदार कुठेही जाणार नाही. सर्व आमदार निष्ठावंत आहे. काहीजणाचे सुपारी घेउन बदनामी करण्याचे काम सुरू असल्याचं कदम म्हणालेत.

COMMENTS