भिवंडीचा ‘सुलतान’ ठरली काँग्रेस, बहुमताचा फिगर गाठला

भिवंडीचा ‘सुलतान’ ठरली काँग्रेस, बहुमताचा फिगर गाठला

भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणीही स्टार प्रचारक न फिरकतही काँग्रेसने 47 जागांवर घवघवीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा विरुद्ध काँग्रेसमध्येच काँटे की टक्कर पाहायला मिळाली आहे.संपूर्ण निकालाच चित्र पाहता भिवंडी महापालिका निवडनुकीत कॉंग्रेसने 47 जागा जिंकत  एकहाती सत्ता मिळवत इतिहास रचला आहे. तर सपा. एम् आय एम् , राष्ट्रवादी तसेच मनसे ह्या पक्षांना  भिवंडीकरांनी सपशेल नाकरल आहे. भाजपच्या जागा वाढल्या असल्यातरी सत्तेच्या जवळ जाण्यात भाजप अपयशी ठरली आहे.

 

भिवंडीतील 23 प्रभागातील 90 जागांसाठी बुधवारी 51.45 टक्के मतदान झाले होते. मागील वेळेपेक्षा साधारण पाच टक्के अधिक मतदान झाल्याने प्रत्येक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत. मागील वेळी कॉगेसचे 26 नगरसेवक होते. मात्र सर्वाचे दावे फोल ठरवीत कॉगेसने सत्तेसाठी बहुमताचा आकडा पार करीत तब्बल 47 जागा निवडून आणल्या. त्यांच्या खालोखाल  भाजपने 8 नगरसेवकावरून 19 चा पल्ला गाठला. मात्र शिवसेनेची संख्या 16 वरून12 वर आली. तर समाजवादी पार्टी 16 वरून त्यांची मोठी घसरण होवून संख्या2 वर आली.  राष्ट्रवादीने मोठा गाज्यावाज्या करीत प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र 6 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. तर मनसे, संभाजी बिग्रेड, एमआयएम, या पक्षाचे पानिपत झाले.

दरम्यान, भाजप व कोणार्क विकास आघाडीची युती असूनही त्यांची संख्या 6 वरून 4 वर आल्याने विलास पाटील मित्र मंडळीच्या गोटात नाराजी पसरल्याचे पाहवयास मिळाले आहे. तर दोन अपक्ष  तसेच रिपब्लिकन (एकेवादी) ने पहिल्यादाच 4 नगरसेवक निवडून आणले.  मराठी मतांच विभाजन होउन टी मत सेना आणि बीजेपी मधे विभागली गेली तर सेक्युलर मत ही  कॉंग्रेसला मिळाली म्हणून कॉंग्रेसचा विजय झाल्याच कपिल पाटिल म्हणाले. भाजप आणि इतर पक्षांना भिवंडीकर वैतागले म्हणून कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळाली अस कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शोएब गुड्डू यांनी सांगीतले. कॉंग्रेसचा हा विजय नसून सेना, बीजेपीची हार असल्याच मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलय. आज शहरात निकालादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 2600 पोलीस तैनात करण्यात आले होते.

COMMENTS